राजेंद्र झेंडे
दौंड :महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यात जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. दौंड तालुक्यात १ ते १२ जून पर्यंत २७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ही माहिती दौंड तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक विजय विप्पर यांनी दिली.
दौंड तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह समाधान कारक पाऊस झाल्याचे चित्र आहे. शनिवारी ( दि.११ ) तालुक्यातील पाटस केडगाव परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली तरी इतर ठिकाणी रिमझिम स्वरूपात पाऊस झाला. दौंड तालुक्यात शनिवारी ( दि.११ ) रोजी
यवतला १० मिलीमीटर, पाटस ३४ मिलीमीटर, केडगाव २६ मिलीमीटर,देऊळगाव राजेला मात्र हुलकावणी दिली,
रावणगाव ४ मिलीमीटर,वरवंड ९ मिलीमीटर, दौंड व राहु ६ मिलीमीटर असा एकुण ९५ मिलीमीटर पाऊस झाला आहे तर १ ते ११ जुन पर्यंत तालुक्यात एकूण २७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यवतला ६६ मिलीमीटर, पाटस ३४ मिलीमीटर, केडगाव ४५ मिलीमीटर, देऊळगाव राजे १५ मिलीमीटर, रावणगाव १९ मिलीमीटर, वरवंड ४२ मिलीमीटर,
दौंड १४ मिलीमीटर तर राहुला ३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील मंडल याप्रमाणे पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे अशी माहिती महसूल सहाय्यक विजय विप्पर यांनी दिली.
दरम्यान, सर्वात जास्त पाऊस यवत परिसरात झाला आहे तसेच पाटस , वरवंड आणि केडगावला बरापैकी हजेरी लावली तर देऊळगाव राजे, रावणगाव,राहु, दौंड परिसरात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे.