सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतीच्या नवीन कार्यालयाच्या इमारतीकरीता १ कोटी २० लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
नविन कार्यालये होणा-या ग्रामपंचायतीमध्ये अजोती, लुमेवाडी, सुरवड, कालठण नं.१, भोडणी, व्याहाळी, तरटगाव व खोरोची या आठ गावांचा समावेश आहे.
या ग्रामपंचायत कार्यालयाकरीता प्रत्येकी १५ लाख इतका निधी मंजुर झाला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सदर कामे जिल्हा परिषद स्वनिधी सन २०२२ – २३ अंतर्गत स्व. आर.आर.(आबा) पाटील ग्रामसचिवालय बांधणे या योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत सन २०२२ -२३ अंतर्गत नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम कामाकरीता ३३ अंगणवाडी करीता ३ कोटी ७१ लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आाला आहे. यामध्ये चाकाटी, वडापूरी पवारवस्ती, भाटनिमगाव गावठाण, वरकुटे बु.चितळकरवाडी, रेडणी कदमवस्ती, कालठण नं.२, गलांडवाडी नं.१, जाधववस्ती, सराटी, गोंदी ओझरे, हगारेवाडी हनुमानवाडी, भोडणी भोंगळेवस्ती, बावडा नं.२ , कडबनवाडी, काटी शेळके राऊत वस्ती, गंगावळण, लाखेवाडी थोरवेवस्ती, शेटफळहवेली, वडापूरी हनुमानवाडी, बेलवाडी, लासुर्णे २, लासुर्णे निंबाळकर मळा, लासुर्णे ४, लासुर्णे वैदवाडी मिनी, जांब, म्हसोबाचीवाडी, शेटफळगढे लामजेवाडी, सणसर 1 , तावशी हरीजन वस्ती, भिगवण स्टेशन अलीकडे, भिगवण स्टेशन पलीकडे, निमसाखर जाधवमळा , लाकडी , निंबोडी अशा एकूण ३३ अंगणवाडी इमारती करीता प्रत्येकी रु.११.२५ लक्ष बांधकाम निधी मंजूर झाला असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.