बारामती : महान्यूज लाईव्ह
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आज दाखल झालेल्या गुन्ह्यात सुमित सुधाकर धर्माधिकारी (रा सुपा ता बारामती जि पुणे), 2) राजेंद्र साहेबराव जगताप (रा खंडुखैरेवाडी ता बारामती जि पुणे) 3) झुंजार पुंडलिक चांदगुडे (रा दापोडी चौफुला ता. दौंड जि पुणे) व 4) आप्पसाहेब विश्वास शिंदे (रा अंतवाडी ता कराड जि सातारा) या चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी रेखा चंद्रकांत चांदगुडे (वय 48 वर्षे व्यवसाय शेती रा.सुपे मजिज्द जवळ सुतारवाडा ता.बारामती जि.पुणे) यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. याबाबत माहिती वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23/3/2015 तसेच 7/11/2015 या कालावधीत मौजे सुपे येथे रेखा चांदगुडे यांची पानसरेवाडी गावचे हददीत जमीन गट नं 345 मधील 5 एकर क्षेत्र आहे. आरोपी सुमित सुधाकर धार्मधिकारी याने रेखा यांचा मुलगा सुधीर चंद्रकांत चांदगुडे यास आपण सुपे या ठिकाणी भागीदारीमध्ये सराफी दुकान टाकू असे सांगितले.
या दुकानासाठी चांदगुडे यांची 5 एकर जमिन खंडुखैरेवाडी, सुपे येथील खासगी सावकार राजेंद्र साहेबराव जगताप याच्यामार्फत दुसरा सावकार झुंजार पुंडलिक चांदगुडे याच्यासह सावकार आप्पासाहेब विश्वास शिंदे यांना 25 लाख रूपयास गहाणखत करतो असे सांगितले व प्रत्यक्षात खरेदीखताने दिली.
वरील सावकारांनी त्यांच्याकडे सावकारकीचा कोणताही परवाना नसतांना फिर्यादीचा मुलगा सुधीर चंद्रकांत चांदगुडे यास 25 लाख रूपये 5 टक्के व्याजदराने 5 एकर जमिन तारण म्हणुन खरेदीखत करून घेऊन दिले फिर्यादीच्या मुलाने त्यांना 25 लाखापेक्षा जास्त व्याज देऊनही त्यांनी पैसे द्या, नाहीतर तुमचेकडे बघुन घेईन अशी धमकी दिली. व फिर्यादीची घेतलेली 5 एकर जमिन परत न देता सदर जमिनीवर पतसंस्थेकडुन 34 लाख रूपयाचे कर्ज घेऊन फिर्यादीची जमिन परत न देता त्यांनी फसवणुक केली.
यावरून पोलिसांकडे रेखा चांदगुडे यांनी फिर्याद दिली. त्यावरुन वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास फौजदार शेलार हे करीत आहेत.