राजेंद्र झेंडे
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील आणि पुणे सोलापुर महामार्गालगत असलेल्या यवत येथील प्रसिध्द हॉटेलमध्ये असे नेमका काय काळाबाजार सुरू होता की दोन तोतया भामट्यांना तब्बल ४ लाख ४२ हजार ५०० रुपये त्यांच्या खात्यावर आँनलाईन जमा केली. या भामट्यांना हा मालक का घाबरला, आपले हॅाटेल सील होईल, यावर कारवाई होणार या भीतीनेच ही आर्थिक तोडजोड झाली. मग या हॅाटेल मध्ये नेमके असं काय चालायचं आणि ग्राहकांना नेमके काय खाण्यास दिले जात होते. याबाबत आता यवतसह दौंड तालुक्यात उलट सुलट चर्चेंना उधाण आले आहे. यवत पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करतील का ? आणि खरे अन्न व प्रशासक नियंत्रण विभाग याठिकाणी छापा टाकून चौकशी करतील का ? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेला जात आहेत.
मराठीत एक म्हण आहे ज्याला कर नाही त्याला डर कशाची, काल यवत पोलीसांनी यवत येथील नामांकित हॅाटेल कांचनच्या मालकास मंत्रालयातुन अन्न व प्रशासक निरीक्षक असल्याचे भासवून कारवाई करण्याची धमकी देत आणि कारवाई टाळायची असेल तर खात्यावर पैसे जमा करावी अशी चर्चा झाली. हॅाटेल मालकाने हॅाटेल सील होईल व आपल्या हॅाटेलवर कारवाई होईल ती टाळण्यासाठी त्यांना वेळोवेळी ४ लाख ४२ हजार ५०० रुपये आँनलाईन पध्दतीने खात्यावर जमा केली. काही दिवासांनी हे तोतया अधिकारी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी यवत पोलीस स्टेशन गाठले आणि फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाने सोलापुरला जाऊन दोन तोतयांना ताब्यात घेतले.याबाबत यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी काल ही माहिती दिली.
मात्र, मागील अनेक वर्षापासून हॅाटेल कांचन हे पुणे सोलापुर महामार्गालगत सुरू आहे. या हॅाटेल मध्ये नाष्टा आणि जेवण करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. यामुळे अल्पवधीतच हे हॅाटेल पुणे सोलापुर महामार्गावर प्रसिध्द झाले. हॅाटेल मालक हा ऊरळीकांचन येथील आहे. मध्यंतरी या हॅाटेल मध्ये आग लागल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली होती. यामुळे अनेक ग्राहकांनी हळहळ व्यक्त केली होती. मात्र सध्या हे हॅाटेल चर्चेत आहे. या हॅाटेल
मालकास दोन तोतयांनी पावणे चार लाखाला लुटले आहे. या प्रकरणांची पोलीस सखोल चौकशी करतीलही पण या हॅाटेल बद्दल अशी काय माहिती या दोन भामट्यांना मिळाली होती आणि ती माहिती त्यांना कोणी दिली होती. काय प्रकार या हॅाटेल मध्ये सुरू होता की ज्यांच्या भीतीने ऎवढे पैस देण्यात आले हे ग्राहकांना आता समजले पाहिजे. हॅाटेल मध्ये ग्राहकांना भेसळ युक्त नाष्टा आणि जेवण तर मिळत नव्हते ना, अशी शंका आता अनेक ग्राहक उपस्थित करीत असून तशी चर्चा यवत परिसरात आहे. हॅाटेल मालकाचा या परिसरात चांगलाच दबदबा असून शिवाय या मालकाचे राजकीय व्यक्तींशीही चांगले संबंध आहेत. मग असे असताना हे हॅाटेल मालक या तोतयांना फसलेच कसे अशी चर्चा या परिसरात आहे. या प्रकाराची अन्न व प्रशासक विभागाने चौकशी केल्याच नक्कीच सत्य समोर येईल अशी मागणी आता ग्राहक करीत आहेत.