बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाला शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली . ९ जून रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप नकाते हे आपल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी तिथे घेऊन आले होते. त्यावेळी डॉ. प्रिया हरदास आणि जीवनज्योती डिसिल्हा या ड्युटीवर होत्या. प्रिया हरदास यांनी रुग्णाची तपासणी केल्यानंतर सोनोग्राफी करण्यास सांगितले. सोनोग्राफी केल्यानंतर पुढील उपचार करता येतील असे सांगितले. त्यानंतर नकाते यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तु उपचार करणार की नाही ते सांग, इंजेक्शन देणार की नाही ते सांग अशा एकेरी बोलण्यास आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. त्यावेळी अधिपरिचारक अमोल नारायण जामदार यांनी नकाते यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नकाते यांनी त्यांनाही शिवीगाळ केली. नकाते यांनी हॉस्पीटलमधील खुर्च्या फेकून दिल्या. टेबल आणि बेड पलटी केले.
आता त्यांच्याविरोधात अमोल जामदार यांनी नकाते यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळे आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.