बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी येथे अल्पवयीन मुलीला बळजबरीने समाज मंदिरात घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा घडला आहे.
पिडीत मुलगी काल शुक्रवारी ( १० जून ) रोजी सकाळी दुकानात साबण आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी अभिमन्यू भारत लांडगे या आरोपीने तिला तिथून जबरदस्तीने समाजमंदिरात आणले. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर कुणालाही न सांगण्याची धमकी दिली.
पिडितेच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल घुगे पुढील तपास करत आहेत.