इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील हिंगणेवाडी येथील शेतकरी तानाजी बाबुराव पवार (वय ४५ वर्षं) यांचा आज विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळच्या वेळी शेतात वीज पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागून ही दुर्दैवी घटना घडली.
तानाजी पवार हे कंत्राटी तत्त्वावर कारखान्यात कामाला होते, तर त्यांची अर्धा एकर शेती हिंगणेवाडीत आहे. आज सकाळी ते विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी शेतामध्ये गेले होते. वीज पंपाच्या स्टार्टर मध्ये विजेचा प्रवाह शिरून त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला.
तानाजी पवार यांच्या निधनामुळे परिसरातील शेतकऱ्यांना धक्का बसला. हिंगणेवाडी सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी या संदर्भातील माहिती दिली.