सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा व नविन जिंदाल यांनी मुस्लिम समाजाच्या मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल इंदापूरच्या मुस्लिम बांधवांनी या घटनेचा निषेध म्हणून आज शनिवार ( दि. ११ ) इंदापूर बंदची हाक दिली आहे.
शर्मा व जिंदाल यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी इंदापूर शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत काल शुक्रवारी इंदापूर शहरातून पायी चालत जात इंदापूर पोलिस स्टेशनला निवेदन दिले.
नुपुर शर्मा व नविन जिंदाल याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करत सर्व मुस्लिम बांधवांनी इंदापूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना निवेदन दिले आहे.