सामाजिक

अवैध वाळू उपशाचे आगार असणा-या शहा परिसरात वाळू माफिया पुन्हा सक्रीय ! मात्र इंदापूर पोलिसांचा वाळू उपशावर धडक कारवाई ! ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त..तीन आरोपी ताब्यात..!

सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह

उजनी जलाशयाच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यासाठी वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले आहे. अवैधपणे वाळू उपशाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यातील शहा गावच्या परिसरात वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. इंदापूर पोलिसांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम राबवत असल्याचे दिसत असून इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर व त्यांच्या पोलिस पथकाने शहा परिसरामध्ये अवैध वाळू उपशावर धडक कारवाई केली. कारवाईत एक फायबर बोट व एक सेक्शन बोट अशा दोन बोटी व यंत्रसामुग्री असा ४३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी काही महिन्यापूर्वी इंदापूरची सूत्रे घेतल्यानंतर बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आळा बसवला आहे. पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या कार्यकुशलतेमुळे इंदापूरची सर्वसामान्य जनता समाधानी आहे. तर अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. शहा येथील अवैध वाळू उपसा प्रकरणातील आरोपींवर भादवि कलम ४३९ व इतर कलमानुसार इंदापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

सदरची कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागाचे डीवायएसपी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक पाडूळे, पो.ना मनोज गायकवाड,पो.कॉ. केसकर, पो. कॉ. शिंगाडे यांनी केली असून तपास सपोनि पवार करीत आहेत.

tdadmin

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago