इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील एका घटनेत थरारकपणा जितका पुढे आला; तितकाच एका मातेचा तिच्या मुलाप्रती असलेला स्नेहभाव देखील समोर आला..! लहानग्या मुलाला दरोडेखोरांनी काही करू नये म्हणून रुद्रावतार धारण केलेल्या महिलेच्या पुढे चार सशस्त्र दरोडेखोरांनी नांगी टाकली आणि महिला त्यांच्या अंगावर धावून जाताच दरोडेखोर पळत सुटले.
याचा व्हिडिओ पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता
इंदापूर शहरातील या घटनेने घटनेची सध्या जोरात चर्चा सुरू आहे इंदापूर शहरातील पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या काळजी फर्निचर दुकान शेजारी उत्तर प्रदेशातील एक कुटुंब मोलमजुरी करत आहे ते या ठिकाणी छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये राहते काल रात्री नीलम कश्यप ा महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे सध्या इंदापूर तालुक्यात या महिलेची चर्चा सुरू आहे
पत्रावजा शेडमध्ये नीलम कश्यप त्यांचे पती धर्मराज कश्यप आणि एक छोटा मुलगा असे परप्रांतीय कुटुंब या काझी फर्निचर शेजारी राहतात. ३ जूनच्या रात्री ही घटना घडली.
चार सशस्त्र दरोडेखोर या घरात शिरत होते. पत्रावजा शेडमध्ये दरवाज्याच्या ऐवजी लावलेला पुठ्ठा या दरोडेखोरांनी बाहेर काढला. त्याची चाहूल लागताच नीलम कश्यप या सावध झाल्या. आपल्या बाळाला दरोडेखोरांनी काही करू नये, म्हणून अचानक रुद्रावतार धारण केलेल्या नीलम कश्यप यांनी चोरट्यांना प्रतिकार केला.
सीसीटीव्हीमध्ये हा थरार कैद झाला असून यामध्ये एक दरोडेखोर नीलम कश्यप यांना चाकूने वार करण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र चोर चाकू दाखवत असतानाच, या चाकूची भिती न घेता महिलेने असा रुद्रावतार धारण केला की, ती थेट या चोरांच्या अंगावर धावून गेली. अनपेक्षितपणे झालेला प्रतिकार पाहून चोरटे एका सेकंदात तिथून पळून गेले.