मुंबई : महान्यूज लाईव्ह
२८ मे २ जून हे सहा दिवस जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर एक महिलेचे ऑपरेशन करण्यात गुंतले होते. या महिलेच्या पोटातून जे काही निघाले ते पाहून त्यांना धक्काच बसला.
युंगाडाची रहिवासी असलेल्या या महिलेला युगांडावरून मुंबईला येत असताना मुंबई विमानतळावर अडविण्यात आले. तिच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाली होती. परंतू तिच्या सामानाची कसून तपासणी घेऊनही काहीही मिळाले नाही. पण ती काहीतरी लपवत असल्याचा अधिकाऱ्यांना संशय होता.
अधिक चौकशीनंतर ती आपल्या शरीरात अमली पदार्थ लपवून त्याची तस्करी करत असल्याचे मान्य केले. त्यानंतर तिला जे.जे रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी २८ मे ते २ जून हे सहा दिवस प्रयत्न करून तिने गिळलेल्या ६४ कॅप्सूल शरीरातून बाहेर काढल्या.
त्या कॅप्सूलमधून ५३५ ग्रॅम हेरॉईन व १७५ ग्रॅम कोकिन हे अमली पदार्थ निघाले. त्याची किंमत सुमारे ३ कोटी रुपये इतकी आहे. आता ही महिला नेमकी कोणाला ते अंमली पदार्थ पुरवणार होती याबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो तपास करत आहे.