यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई !
दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस स्टेशनमध्ये १६ गुन्ह्यातील ट्रान्सफॉर्मर रोहीत्रे ( डीपी ) चोरणारी फरार झालेल्या अट्टल टोळी यवत पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची जेरबंद केली आहे. चार आरोपींना ताब्यात घेत २ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
अर्जुन दिलीप बर्डे ( वय २०, रा. राहूरी ता.राहुरी जि.अ.नगर सध्या रा.वाडे बोलाई, ता हवेली जि पुणे ), विकास गौतम बनसोडे ( वय २३ रा.नानगाव ता.दौंड जि.पुणे ), पांडुरंग ऊर्फ भावड्या मोहन गायकवाड (वय २३ रा.वडगाव रासाई ता.शिरूर जि.पुणे), लईक ऊर्फ लाला मोहम्मद अमीन मणियार ) वय २१ रा चिखली ता हवेली जि पुणे मुळ रा.गोंडा उत्तर प्रदेश ) अशी अटक केलेल्या आरोपांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २५ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास खुटबाव येथील शेतजमीन ( गट नं.३४८ ) मधील प्रताप काळभोर यांचे शेतात असलेली रोहीत्रांवरील (डीपी )अज्ञात चोरट्याने स्ट्रक्चर वरून नट बोल्ट खोलून खाली पाडून त्यातील ऑइल सांडून नुकसान करून त्यातील अंदाजे एकूण १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्याची घटना घडली होती.
याबाबत यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार यवत पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार निलेश कदम व गुरुनाथ गायकवाड यांना डीपी चोरणारे संशयित राहू येथे येणार असलेची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तत्काळ पोलीसांचे पथक कारवाईसाठी तैनात केले. या पथकाने राहू येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सापळा लावला. संशयित आरोपी मोटार सायकल वरील तीन आरोपी लक्ष्मीआई मंदिराजवळ आले असता त्यांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
या आरोपींनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पाटस,कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव,उंडवडी,कोरेगाव भिवर या गावांमधील एकूण १२ रोहित्र ( डीपी )चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. चोरीस गेलेल्या तांब्याच्या तारा वितळून तयार केलेले एकूण ३०० किलो वजनाचे त्रिकोणी आकाराचे तांब्याचे ठोकळे किंमत १ लाख ५० हजार व मोटारसायकल जप्त करण्यात आली. दरम्यान, या आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख , बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरू गायकवाड, पोलीस नाईक अक्षय यादव, उमेश गायकवाड,,पोलीस शिपाई तात्या करे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ,
पोलीस नाईक अजय घुले व पोलिस मित्र नीलेश चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.