मुंबई : महान्यूज लाईव्ह
‘ बाईच दुखण बाईलाच माहिती ‘ असे मासिक पाळीबाबत नेहमी बायका म्हणत असतात. दर महिन्यात येणारे हे चार त्रासदायक दिवस महिलांना भोगावे लागतात. या चार दिवसांचा त्रास सोसूनच त्यांना जगाच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते.
चीनची टेनिसपटू झिंग किनवेनही या त्रासाबद्दल सार्वजनिक संताप व्यक्त केला आहे. १९ वर्षाची झेंग फ्रेंच ओपनमध्ये खेळत होती. आघाडीची टेनिसपटू इगा स्वितेक हिच्याबरोबर तिची मॅच सुरु होती. तिने पहिला सेटही जिंकला, पण त्यानंतर तिला पाळी आली. तिचे पोट दुखायला लागले. तब्बल ८२ मिनिटे चाललेल्या पहिल्या सेटमध्ये जबरदस्त खेळ करणारी झेंग त्यानंतर ६ – ० आणि ६ – २ अशी दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये हरली. या पराभवाने तिला फ्रेंच ओपनमधून बाहेर पडावे लागले.
यामुळे या पाळीच्या दरमहिन्याच्या दुखण्यावर ती चांगलीच वैतागली. पाळीच्या पहिल्या दिवशी माझ पोट खुप जास्त दुखते, खेळतानाही तेच दुखण सुरु झाल. मी पुरुष असते तर फार बर झाल असत, अशा शब्दात झेंगने मनातील खदखद व्यक्त केली.
खरे तर जगातील प्रत्येक बाईच्या मनातले हे वाक्य झेंगच्या तोंडून बाहेर पडले. कारण प्रत्येक बाई कधी ना कधी मनातल्या मनात हे वाक्य म्हणत असतेच. झेंग पराभवाचे खापर पाळीच्या नावावर फोडते आहे, अशी टिकाही तिच्यावर होत आहे. पण शेवटी ‘ बाईचे दुखणे बाईलाच माहिती ‘ !