इंदापूर : महान्यूज लाईव्ह
कुरवलीच्या अवधूत सतीश पांढरे यांनी नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी होण्याचा बहुमान मिळवला आहे. भारतीय नौसेना अकादमी कन्नूर केरळ येथे १०२ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ काल संपन्न झाला.यामध्ये एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करीत अवधूत पांढरे सब लेफ्टनंट अधिकारी बनले आहेत.
शेतकरी सतिश पांढरे व गृहिणी बायडा पांढरे यांचा मुलगा अवधूत पांढरे यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी बनला आहे. पांढरे दांपत्याना दोन मुले आहेत. मुलगा नौदल अधिकारी व मुलगी श्रद्धा सीए च्या अभ्यासक्रमास शिक्षण घेत आहे. खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए ) १४० व्या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय नौसेना अकादमी कन्नूर केरळ ( आय एन ए ) येथे १०२ व्या तुकडीत एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून सब लेफ्टनंट पदी नौदलात अधिकारी बनला आहे.
एनडीए मध्ये अवधूत पांढरे यांनी तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर भारतीय नौसेना अकादमी येथे नौदलातील एक वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करून सब लेफ्टनंट अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. अवधूत यांचे १ ली ते ४ थी पर्यंत प्राथमिक शिक्षण कुरवली गावातील चव्हाणवस्ती शाळेत झाले. इयत्ता ५ वी शिक्षण छत्रपती हायस्कूल परीटवाडी येथे व इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत चे शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे पूर्ण केले. या दरम्यान इयत्ता १२ वी मध्ये असताना एनडीएची निवड परीक्षा दिली. त्यामध्ये उत्तीर्ण झाले. मागील तीन वर्षे एनडीए मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. भारतीय नौसेना अकादमी केरळ येथे झालेल्या एक वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर नौदलात सब लेफ्टनंट अधिकारी झाला आहे. शेतकरी कुटुंबातील मुलाने वेगळी वाट शोधत देशकार्यासाठी जाण्याचा मार्ग निवडल्याने परिसरात अवधूतचे अभिनंदन होत आहे.
सतीश पांढरे यांनी मुलांना उच्च शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिले. आपल्या मुलांवर अपेक्षाचे ओझे न लादता त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यास साथ दिली. त्यामुळे आज अवधूतने देशसेवेसाठी एनडीएचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करीत सब लेफ्टनंट अधिकारी झाल्याबद्दल सरपंच शोभा पांढरे, विजयकुमार पांढरे , सत्यवान चव्हाण, दिनेश पांढरे, दिलीप पांढरे,आंबादास कवळे,विठ्ठल फडतरे , बाळू पाटील, अरुण चव्हाण व परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन होत आहे