इंदापूर : महान्यूज लाईव्ह
आपल्या शेतातून जायचं नाही, असं म्हणत आता याला सोडायचा नाही, याला एकदाच बघून घ्या.. असं सांगत सहा जणांनी लोखंडी रॉड, कोयता, दगडाने 31 वर्षीय किरण मधुकर शिंदे याला बेदम मारहाण केली. वालचंदनगर पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात वालचंदनगर पोलिसांकडे किरण मधुकर शिंदे ( वय -31 वर्ष, धंदा- शेती रा.शिंदेवाडी , काझड ता.इंदापुर जि.पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी 1 ) बाळासाहेब सदाशिव शिंदे 2 ) नवनाथ सोमनाथ शिंदे 3 ) वसंत महादेव शिंदे 4 ) गोविंद सोमनाथ शिंदे 5 ) सोमनाथ विठोबा शिंदे 6 ) सुरेखा बाळासाहेब शिंदे (सर्व रा.शिंदेवाडी , काझड ता.इंदापुर जि.पुणे) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.
ही घटना 26 मे रोजी संध्याकाळी साडे सात वाजताच्या सुमारास शिंदेवाडी, काझड गावचे हद्दीत घडली. यासंदर्भात किरणच्या नातेवाईकांनी व पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणच्या कुटुंबियांनी काही दिवसांपूर्वी भावकीतील काही कुकूटपालन केंद्राविषयी ग्रामपंचायत व पोलीस पाटलाकडे तक्रार केली होती. मेलेल्या कोंबड्यांची पिल्ले आपल्या रानात टाकली जात आहेत, त्यामुळे रानात कोणी कामास येत नाही अशी त्याची तक्रार होती.
यावरून भावकीतील काही जणांनी मध्ये त्याच्याविषयी राग होता. दरम्यान 26 मे रोजी किरण हे रानात गुरांना गवत आणण्यासाठी त्यांची मोटार सायकल (नं . MH42 V 2404) वरुन जात असताना आरोपी नं -1 याने त्यांना रस्त्यात अडवुन त्यांना माझे रानातुन जायचे यायचे नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर हातातील लोखंडी रॉड किरण याच्या डोक्यात घातला. इतर पाच जणांनी किरण याला बेदम मारहाण केली, तसेच कोयत्याने मारहाण करून उचलून आपटले. सर्वजण शिवीगाळ करुन मारहाण करीत असताना याला आता एकदाच बघुन घ्या याला सोडायचे नाही असे म्हणून किरणच्या पाठीत, पोटावर कोयत्याने मारुन उचलुन खाली आपटले.
या घटनेत किरण गंभीर जखमी झाल्याने त्याला बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे बारामती शहर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून वाचन पोलिसांकडे गुन्हा वर्ग झाला, वालचंदनगर पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक निरीक्षक बिराप्पा लातूर हे करत आहेत.