दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड शहरसह तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्या गाठीभेटी संपर्क साधण्यासाठी समस्या सोडविण्यासाठी शिव संपर्क अभियानास खासदार कृपाल तुमाने यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे.दौंड तालुक्यात खासदार कृपाल तुमाणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी ( दि.२६) शिवसंपर्क अभियानाची सुरवात झाली.
यावेळी खासदार तुमाने म्हणाले की, शिवसंपर्क अभियानाचे पुढील चार दिवस प्रत्येक शिवसैनिकांनी तालुक्यातील प्रत्येक गावात ,प्रत्त्येक घरातील नागरिकापर्यंत संपर्क करून त्यांच्या समस्या जाणून घ्यावे. शिव संपर्क अभियान हे शिवसेना तळागाळात पोहचविण्यासाठी प्रभावी माध्यम असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने केलेली लोकाभिमुख कामे राज्यातील जनतेच्या घराघरात पोहचवा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश पासलकर , महिला संपर्क संघटिका शालिनी देशपांडे, शिवसेनाचे प्रवक्ते विठ्ठल पाटील ढमाले, महिला जिल्हा सह संपर्क संघटिका स्वाती ढमाले, महिला जिल्हा संघटिका निता भोसले, शिवसंपर्क अभियान निरीक्षक हेमंत रासकर, राकेश तटकरे तसेच तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान,या वेळी अनेक तरूणांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केल्याने खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.