पुणे : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्राचे मंत्री विश्वजित कदम यांचे सासरे आणि सर्वपक्षीय नेत्यांची अत्यंत घनिष्ठ संबंध ठेऊन असलेले पुण्याचे प्रख्यात बिल्डर अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. डीएचएफएल घोटाळा प्रकरणात ही अटक झालेली आहे. यापूर्वीही अनेकदा त्यांची विविध प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे.
२०१८ मध्ये हा डीएचएफएल घोटाळा झाला. एप्रिल ते जूनमध्ये हजारो कोटी रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले. या प्रकरणात अविनाश भोसले, संजय छाब्रिया, बलवा आणि गोएंका यांचा समावेश होता. येस बॅंकेचे तत्कालिन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये ३७०० कोटी रुपये कर्जरोख्यांतून गुंतवले होते. यामध्ये राणा यांना ६०० कोटींची दलाली मिळाल्याचे नंतर समोर आले. यानंतर डीएचएलएफने हे पैसे छाब्रिया यांच्या रेडियस ग्रुप, भोसले यांच्या इन्फ्रा लिमिटेड आणि बलवा आणि गोयंकाच्या कंपनीत वळते केले होते. त्यानंतर पहिल्यांदा छाब्रिया यांना सीबीआयने अटक केली. त्यानंतर भोसले, बलवा आणि गोएंका यांच्यावर छापे टाकण्यात आले होते. आता याच प्रकरणी अविनाश भोसले यांना अटक करण्यात आलेली आहे.
आजच ईडीने अनील परब यांच्या मालमत्तांवर धाडी टाकून साडेतेरा तास त्यांची चौकशी केली आहे. तर आजच अविनाश भोसले यांनाही अटक करण्यात आलेली आहे.
बिल्डर, महसूल अधिकारी, पुढारी यांचे लागेबांधे भ्रष्टाचारास प्रेरणा देणारे तर नोंदणी विभागात बेकायदेशीर दस्त कागदपत्रे बदलणारी यंत्रणा, फलटण जगदीश करवा व रजीषटरही या प्रकरणात सामील, पुण्याचे बिल्डर फलटण मध्ये????