बारामती : महान्यूज लाईव्ह
विद्या प्रतिष्ठानच्या कला , विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील बी बी ए-(सी ए) विभागाच्यावतीने आयआयटी बॉम्बे संलग्नित स्पोकन ट्यूटोरियल कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी प्रा. अनील काळोखे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. महाविद्यालयातील बी बी ए -( सी ए ),संगणक शास्त्र , बीसीए – विज्ञान या विभागातील 709 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांसाठी C, C++, RDBMS, Java, Python,Android, HTML इ. कोर्सेस चे आयोजन करण्यात आले होते. विभाग प्रमुख प्रा. महेश पवार यांनी विभागाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचा आढावा प्रास्ताविक करताना घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात असे कोर्सेस करून नेहमी अग्रेसर राहिले पाहिजे असे प्रतिपादन केले. या विभागातील रोहन देशमुख, माने सुप्रिया, रेवती चौधरी ,ऋतुजा सोहनी, पूजा त्रिभुवन या विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विप्रो, इन्फोसिस, कॅपजेमिनी या कंपन्या मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ. शिंदे व गजानन जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागातील सहकारी विशाल शिंदे, अक्षय भोसले, अक्षय शिंदे, कांचन खिरे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम गुंजवटे यांनी केले व अनिल काळोखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.