पुणे : महान्युज लाईव्ह
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आज एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अशी माहिती संघाचे अध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली.
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या लवकरात लवकर करण्यात यावी. पुणे जिल्हा परिषदेमध्ये मुख्याध्यापक पदोन्नती तात्काळ करण्यात यावी,कोरोना महामारीच्या काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपये विमा योजनेचा लाभ देण्यात यावा,शिक्षण सेवकांचे मानधन पंचवीस हजार रुपये करावे, सर्व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करावी,गट साधन केंद्रातील कंत्राटी तत्वावरील कामगारांना सेवेत कायम करावे,अशा विविध मागण्यांसाठी सोमवारी ( दि.२३) हे धरणे आंदोलन करण्यात आले असून शिक्षण आयुक्त पुणे यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी संघाचे राज्य अध्यक्ष गौतम कांबळे, राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,राज्य महासचिव विठ्ठल सावंत , पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण, दौंड कार्याध्यक्ष रवींद्र अहिवळे ,पुणे मनपा शाखा कैलास थोरात , हवेली तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड ,इंदापूर तालुकाध्यक्ष सुहास मोरे,मिलिंद देटगे ,विनोद कुमार भिसे, अमोल लोंढे ,बाळासाहेब खरात , बाळासाहेब लोंढे ,विजय काळे ,अनिल सरोदे ,अनुश्री चव्हाण ,विजय वाघमारे ,सोमनाथ गजरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.