बारामती : महान्यूज लाईव्ह
एका वॉरंटमध्ये अटक न करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यातील एक हवालदार आणि एक होमगार्ड लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात अडकले आहेत. अटक न करण्यासाठी या दोघांनी एक हजार रुपयांची लाच मागितली होती.
संबंधित व्यक्तीने याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. एक हजाराच्या लाचेच्या मागणीनंतर ८०० रुपयांवर तडतोड झाली होती. ५ व ६ मे रोजी एबीसीने या प्रकाराची पडताळणी केली होती. या पडताळणीत हवालदार आण्णासाहेब नामदेव उगले याने लाचेच्या मागणीस प्रोत्साहन दिले होते आणि होमगार्ड सनी गाढवे याने प्रत्यक्षात लाच मागितली होती हे तपासात उघड झाले. त्यानूसार आज सोमवारी ( दि. २३ ) रोजी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास एबीसीशी संपर्क साधण्याचे आवाहन या विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी केले आहे.
चांगली गोष्ट आहे. बारामतीची एवढ्यात बरीच प्रकरणे उघडकीस येत आहेत. काय झाल आहे हे पोलीस वाले यांना असं वाटत आहे की यांना एक जहागिरी दिलेली आहे अशा आविर्भावात हे वागत आहेत.
वीस वीस वर्ष झालं एकाच तालुक्यात नोकरी करतात. यांची पहिली दोन जिल्हे सोडून उचलबांगडी करावी.