मुंबई : महान्यूज लाईव्ह
लवकर येणार, लवकर येणार म्हणता म्हणता मान्सून पुन्हा एकदा वाटेतच थांबला आहे. वेळेपूर्वीच अरबी समुद्रात आलेला मान्सून आता तेथेच अडकून पडल्याची माहिती आहे. आता तेथेच तो आणखी दोन ते तीन दिवस विश्रांती घेऊन पुढचा प्रवास सुरु करेल असा हवामान खात्याचा नवा अंदाज आहे.
मान्सूनच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाल्याने आता केरळात येण्यासाठी मान्सून आणखी दोन ते तीन दिवस घेईल. त्यानंतर ५ जूनला कोकणात तर ७ जूनला मुंबईत मान्सून दाखल होईल.
यापु्र्वी यावर्षी ५ जूनलाच मुंबईत मान्सून पोचेल असे सांगितले गेले होते. पण तो दोन दिवस उशीरा येईल असा ताजा अंदाज आहे.
मागील वर्षीही असाच केरळमध्ये आल्यानंतर मान्सूनने दिर्घ विश्रांती घेतली होती. मान्सूनचे हे रेंगाळणे आता दरवर्षीचेच होत आहे असे दिसते आहे. पण काहीही असले तरी शेकडो वर्षाच्या परंपरेनूसार मान्सून येतो आहे हे मात्र नक्की.