शिरूर : महान्युज लाइव्ह
रांजणगाव सांडस परिसरात ऊस तोड कामगाराची हरवलेली रक्कम उमेश रणदिवे यांना सापडल्यानंतर त्या कामगाराचा शोध घेत परत केल्याने त्या युवकाचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.
शिरूर तालुक्यात ऊस तोड अंतिम टप्प्यात असल्याने अनेक ऊस तोड कामगार या ठिकाणी वास्तव्यास आहेत.तसेच गुराळ ऊस तोडणी करण्यासाठी देखील नगर ,नाशिक या भागातून रोजीरोटी कमवण्यासाठी कामगार आलेले आहेत . ऊस तोडणी कामगार दैनंदिन घरखर्च हा ऊसवाडे विक्री करून भागवत असतात.ऊस व्यावसायिक प्रमोद विठ्ठल रणदिवे यांच्या गुऱ्हाळावर ऊस तोडणी करणाऱ्या मजुराचे रोख रक्कम चार हजार पाचशे रुपयाचे पाकिट प्रवासात घाळ झाले होते. सदरील कामगार येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरू यांना पैशाचे पाकीट सापडले का अशी विचारणा करतहोता . परंतु त्याला ते पाकीट न सापडल्यामुळे कामगाराला रडू कोसळले.
आठवडाभर केलेली मेहनत वाया गेली व रविवार न्हावरे येथील आठवडी बाजार असल्यामुळे त्या कामगार कडे एक दमडीही शिल्लक राहिलेली नव्हती. दरम्यान या रस्त्यावरून जात असताना येथील युवक उमेश रणदिवे यांना ४५०० रु रस्त्यावर सापडले होते. हे पैसे ज्याचे आहेत त्याला मिळण्यासाठी चौकशी केली. मात्र मूळ मालकाचा शोध लागत नव्हता. अनेकांच्या पााकिटातील रक्कम व बोलण्यातील रक्कम यातील तफावत जाणवल्यामुळे रणदिवे यांनी ते पाकीट दिले नाही. त्याचा शोध सुरू ठेवला. दरम्यान उमेश यांना मुख्य रस्त्याने ऊस तोडणी कामगार गेले असल्याची माहिती मिळताच ऊस तोडणी टोळीचा शोध घेऊन पाकीट मध्ये किती रक्कम आहे याची विचारपूस केली. मूळ मालकाकडे हरवलेली रक्कम जुळली. त्यानुसार कामगाराला प्रामाणिकपणे उमेश रणदिवे यांनी साडेचार हजार रुपयांचे ते पााकिट परत दिले.त्या पााकिट मिळाल्यावर कामगाराचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण त्या कामगारांच्या दृष्टीने ही रक्कम खूप मोठी होती. त्यांनी पैसे प्रामाणिकपणे परत केले. उमेश रणदिवे यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक केले जात आहे. उमेश रणदिवे यांना ऊस तोडणी कामगार यांनी एक हजार रुपये बक्षीस दिले. उमेश रणदिवे यांनी यापूर्वीच एक हजार वृक्षांची लागवड केलेली आहे. त्या वृक्षांची जोपासना करण्यासाठी रणदिवे या बक्षिस रकमेचा वापर करणार आहेत.
उमेश यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.