मुंबई : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र सरकारनेही व्हॅट कमी केल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी झाले आहेत. काल रात्रीत केंद्र सरकारने कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत.
काल केंद्र सरकारने कर कमी केल्याने पेट्रोलचे दर साडेनऊ रुपयांनी तर डिझेलचे दर सात रुपयाने कमी झाले आहेत. आता राज्य सरकारनेही व्हॅटमध्ये कपात केल्याने पेट्रोल २.०८ रुपयांनी तर डिझेल १. ४४ रुपयांनी झाले आहे.
एकुणच केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनी मिळून केलेल्या करकपातीतून पेट्रोल ११.५० रुपयांनी तर डिझेल ८.४४ रुपये स्वस्त झाल्याने महागाईच्या झळा सोसणाऱ्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे.