मुंबई : महान्यूज लाईव्ह
ईडीच्या कोठडीत असलेल्या राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रथमदर्शनी मलिकांविरोधात दाऊद गॅंगशी संबंधित असल्याचे पुरावे मिळाले असल्याचे मत विशेष कोर्टाने नोंदवले आहे. त्यामुळे मलिक यांच्या जामीनाची वाट खडतर झाली आहे.
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने नवाब मलिक यांच्या विरोधात मनी लॉड्रींगमध्ये समाविष्ट असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या गुन्ह्यात सामील असल्याचे पुरावे मलिकांविरोधात असल्याचे मत कोर्टाने नोंदवले असून कोर्टाने या आरोपपत्राची दखल घेतली आहे.
यामध्ये विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं की, नवाब मलिक यांनी कंपनीशी संबंधित असलेल्या हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरी चा कट रचला. मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशोबी मालमत्ता जमवली. त्यामुळे हे सर्वजण शिक्षेसाठी पात्र असल्याने मत कोर्टाने नोंदवले आहे.
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या आरोपपत्रानुसार, नवाब मलिक यांनी गोवावाला कंपनीमधील बेकायदेशीर भाडेकरूंच्या सर्वे करून घेतला होता. त्यामुळे त्यांना तेथील अनियमिततेची माहिती होती. यासंदर्भात मलिक यांनी सरदार खान व हसीना पारकर सोबत अनेकदा बैठका घेतल्या होत्या. सरदार खान हा हसीना पारकर सोबत होता. सरदार खानचा भाऊ तिथे भाडे वसूल करायचे काम करायचा.
सरदार खानने ईडीला दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे कुर्ला जनरल स्टोअर च्या नावाने एक गाळा ठेवला. त्याची मालकी त्यांचा भाव अस्लम मलिक यांच्या नावे होती. गोवावाला कंपाऊंडचा जास्तीत जास्त भाग गिळंकृत करण्यासाठी नवाब मलिक यांनी तिथे बेकादेशीर भाडेकरू घुसवले असे कागदपत्रावरून सिद्ध होत आहे.