सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात भूजल साठा वाढला पाहिजे, तसेच सिंचन क्षेत्रातील टक्का वाढण्यासाठी मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
इंदापूर तालुक्याच्या खेडोपाड्यातील ओढ्या नाल्यांवर ६५ ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधणे व पाच ठिकाणी पाझर तलाव रूपांतरित करणे व तीन बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी व्हावी यासाठी राज्याच्या जलसंधारण खात्यातून ४९ कोटी ३ लाख ९३ हजारांचा भरघोस निधी मंजूर केल्याची माहिती मृद् व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी आदी विकासकामांसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणत असतानाच मंत्री भरणे यांनी तालुक्यातील जलसंधारणाची कामे करण्यासाठी हा निधी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. गावोगावच्या ओढया नाल्यांवर बंधारे झाल्यास वाहून जाणारे पावसाचे पाणी आडवून ठेवता येणार आहे.त्यामुळे भुजलसाठा वाढणार असून सिंचनाचा टक्का वाढविण्यासाठी मदत होणार आहे.
यामध्ये प्रामुख्याने व्याहाळी साठवण तलाव ७.५८ कोटी, शेटफळ गढे साठवण तलाव ५.२५ कोटी ,काळेवाडी साठवण तलाव ७.५२ कोटी, भावडी साठवण तलाव ५.४८ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. याठिकाणी रूपांतरित साठवण तलाव करण्यात येणार आहेत. न्हावी येथे १ कोटी २३ लाखांचा निधी खर्चून नवीन पाझर तलाव बांधण्यात येणार आहे.
तर तालुक्यातील कळस गजानन वायाळ शेत ३२.१० लक्ष, कळस गावडे वस्ती ३१.२४ लक्ष, ओमासे शेत ४०.७६ लक्ष, पिटकेश्वर जाधव वस्ती २५.५३ लक्ष,
पिटकेश्वर सुजित भिसे शेत ३०.६५ लक्ष, कौठळी गावठाण ४२.१३ लक्ष, कौठळी रतीलाल काळेल ३२.६८ लक्ष, कडबनवाडी रोहिदास गावडे शेत २६.५९ लक्ष, सराफवाडी मोहंमद शेख वस्ती ५६.०२ लक्ष, दगडवाडी चव्हाण वस्ती ५०.८४ लक्ष,भांडगाव यमाई माता मंदिर ४१.८४ लक्ष ,भांडगाव बर्गे शेत २८.७३ लक्ष,भांडगाव गायकवाड शेत ३५.१० लक्ष, कळंब सुनील सोलनकर शेत २१.०८ लक्ष, कळंब अनिल सोलनकर शेत २६.०४ लक्ष, कळंब वीरवस्ती ३४.७६ लक्ष,बावडा बागल शेत ४४.६२ लक्ष, बोराटवाडी दादा साखरे मळा ३०.५९ लक्ष, बोराटवाडी हेगडकर अवताडे शेत ३०.६५ लक्ष, गलांडवाडी विठ्ठलवाडी गोविंद बोराटे शेत ४०.०९ लक्ष,
गलांडवाडी विठ्ठलवाडी डाके वस्ती ३४.१५ लक्ष,गलांडवाडी विठ्ठलवाडी तुळशीराम बोराटे शेत ४०.०९ लक्ष,शिरसटवाडी राहुल जाधव शेत ४३.७७ लक्ष,शिरसटवाडी अप्पा माळी वस्ती ३६.९०लक्ष, शिरसटवाडी भानुदास नागाळे वस्ती ३६.४३ लक्ष, शिरसटवाडी शिवदास हगवणे मळा ३९.८५ लक्ष, शिरसटवाडी रंजना देवकर शेत २६.०९ लक्ष, शिरसटवाडी हनुमंत कदम मळा ६१.०७ लक्ष, चाकाटी सुभाष तनपुरे शेत २४.९८ लक्ष,काझड म्हेत्रे शेत २५.९८ लक्ष,काझड म्हेत्रे विहीर ३०.८७ लक्ष, काझड हनुमानवाडी २५.९३ लक्ष, काझड नाना नरुटे शेत २५.०२ लक्ष, बोरी धनु शिंदे शेड २४.२८ लक्ष,बोरी चांगण गुरुजी शेत २४.३० लक्ष, तरंगवाडी चितळकर तरंगे शेत २४.८३ लक्ष,तरंगवाडी तुकाराम करे शेत २४.७० लक्ष, निंबोडी महादेव घोळवे विहीर २३.८२ लक्ष,गोपीचंद घोळवे शेत २३.७४ लक्ष,मारुती घोळवे विहीर २३.८० लक्ष, गोतंडी स्मशानभूमी ३२.१९ लक्ष, गोतंडी जेनवडी अडसूळ २५.३३ लक्ष, गोतंडी भरत नलवडे शेत २३.८५ लक्ष,गोतंडी हनुमंत लोहकरे शेत २५.७० लक्ष,गोतंडी अमोल जाधव शेत ३२.१९ लक्ष, गोतंडी संतोष भोसले शेत २५.७० लक्ष, रणगाव हनुमंत रकटे ३७.१७ लक्ष, निमसाखर रणजित पवार बंगला ३६.६० लक्ष, रेडणी हनुमंत कदम सुभाष पाटील ३२.११ लक्ष, रेडणी नारायण रुपनवर सुभाष पाटील शेत ३२.३७ लक्ष, खोरोची अनिल नगरे सलगर शेत ४०.४७ लक्ष,पिंपळे बापू ठवरे ३४.१९ लक्ष,काटी पडसळकर मळा २४.९९ लक्ष,रेडा गट नं२५४ २९.५० लक्ष, रेडा उत्तम देवकर मळा २९.६१ लक्ष, कालठन नं.१ जगताप वस्ती ४५.४४ लक्ष, निमगाव केतकी अमोल हेगडे मळा २५.४७ लक्ष भोसले वस्ती ५१.०५ लक्ष ,गुजर मळा ३५.१३ लक्ष,गोखळी पारेकर वस्ती २२.८२लक्ष, गोखळी अण्णा तरंगे महादेव क्षीरसागर शेत २८.१२ लक्ष,गोखळी तरंगे वस्ती २३.७८ लक्ष, गोखळी अंकुश वाघमोडे २४.७० लक्ष,मदनवाडी म्हसोबा मंदिर ६२.१३ लक्ष व कचरवाडी श्रीरंग शेंडगे विहीर ३५.५७ लक्ष या गावांतील ओढ्यांवर मिळून ६५ ठिकाणी कोल्हापुरी बंधारे बांधण्यात येणार आहेत.
याशिवाय मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत कडबानवाडी येथील दोन व निरगुडे येथील एका बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ५६ लाख ९३ हजारांचा निधीही मंजूर करण्यात आल्याचेही राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.