औरंगाबाद : महान्यूज लाईव्ह
औरंगाबादमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्याने १४ कोटी ४७ लाख रुपये किमतीचा गोपनीय डेटा चोरल्याची तक्रार दाखल झाली आहे. संबंधित कर्मचारी आता कंपनी सोडून गेली आहे. परंतू कंपनीत असताना तिने हा डेटा चोरल्याचे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे.

शिवानी कुरूप असे या आरोपी तरुणीचे नाव आहे. २२ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२१ या काळात ही डेटाची चोरी झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एण्ड्यूरन्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक रोहित महेंद्र साळवी यांनी याबाबत तक्रार दिली आहे. कंपनीमध्ये काम करत असताना शिवानीचे इलेक्टॉनिक माध्यमाचा वापर करून हा गोपनीय डेटा चोरल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
गतवर्षी डिसेंबर महिन्यात ती कंपनी सोडून गेली. त्यानंतर तिच्या संगणकाची तपासणी केली असता तिने केलेला हा प्रकार उघडकीस आला. कंपनीने या डेटाची किंमत १४ कोटी ४७ लाख इतकी ठरवली आहे. आता नाशिक सायबर पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल असून पोलिस निरीक्षक गौतम पातारे या गु्न्ह्याचा तपास करीत आहेत.