दौलतराव पिसाळ
वाई : महान्यूज लाईव्ह
वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे आणी डिबी पथक वाईच्या एमआयडीसीत सापळा लावुन बोपर्डी येथील चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेण्यासाठी फिरत असताना चोरटा त्या जाळ्यात अडकला आणी त्याच्या कडून ८५ हजार रुपये किंमतीच्या वाई शहरातील विविध भागातून चोरलेल्या ३ दुचाकीसह वाल्हे, ता.पुरंदर येथील टिव्हीएस मोपेड दुचाकी अशा एकूण ४ दुचाकी चोरट्याकडुन हस्तगत करण्यास डिबी पथकाला यश आले आहे.
वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिलेली माहिती अशी की बोपर्डी, ता.वाई येथून दि.१८ मे रोजी तक्रारदार यांच्या राहत्या घराच्या अंगणात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हिरोहोंडा ही दुचाकी उभी केली होती
ती भर दुपारी अज्ञात चोरट्याने डुप्लीकेट चावीचा वापर करुन लॉक काढुन लंपास केल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दि. १९ रोजी दाखल झाली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन चोरट्याला तातडीने गजाआड करण्यासाठी वाई पोलिस ठाण्यातील डिबीचे पथक प्रमुख सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विजय शिर्के, महिला पोलिस नाईक सोनाली माने, पोलिस नाईक शिवाजी वायदंडे, कॉस्टेबल किरण निंबाळक,र श्रावण राठोड, अमीत गोळे, प्रसाद दुदुस्कर यांना या चोरट्याला पकडण्याची जबाबदारी दिली.
पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना दुचाकी चोरटा हा वाईच्या एमआयडीसीतच चोरीची दुचाकी फिरवत असल्याची माहिती मिळाली. डीबी पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून आरोपी गणेश धर्माजी कळंबे वय २८, रा. बोपर्डी
त्याला ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणले .
त्याला विश्वासात घेऊन आणखी कोठे कोठे गाड्या चोरल्या आहेत अशी माहिती विचारताच त्याने पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथुन १ टिव्हीएस मोपेड, रविवार पेठ, वाई येथुन डिलक्स मोटरसायकल व वाई नगरपालिका
समोरुन बजाज कंपनीची बॉक्सर अशा गाड्या चोरल्याची माहिती त्याने दिली. या सगळ्या गाड्या डीबी पथकाने ताब्यात घेतल्या.
या कामगिरीबद्दल वाई पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भरणे आणि डीबी पथकाचे नागरिक अभीनंदन केले आहे.