माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भाटघर धरणात आज पाच जणी बेपत्ता झालेल्या असून, पोलिसांच्या व स्थानिकांच्या मदतकार्यातून आत्तापर्यंत तीन जणींचे मृतदेह हाती आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान स्थानिक एका मुलींसह बाहेरगावाहून आलेल्या या नातेवाईक महिला असून त्या पोहण्यासाठी धरणामध्ये गेल्या होत्या. अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
खुशबू लंकेश रजपूत (वय १९ रा बावधन), मनीषा लखन रजपूत (वय २०), चांदणी शक्ती रजपूत (वय २१), पूनम संदीप रजपूत (वय २२, तीनही रा. संतोषनगर, हडपसर पुणे), मोनिका रोहित चव्हाण (वय २३ रा नऱ्हे) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.
दरम्यान त्यापैकी तीन जणींचे मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली. तीन मृतदेह अद्याप पर्यंत हाती आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या पाच जमिनीपैकी चार मुली व एक सून असे एकाच कुटुंबातील नातेवाईक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सह्याद्री पथकाच्या वतीने शोध मोहीम सुरू असून, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक निरीक्षक खामगळ, सहायक निरीक्षक श्री. नवसरे आदींचे पथक या ठिकाणी घटनास्थळी मदत कार्यात थांबून आहेत.