माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. १९ – शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे साहेब यांच्या धगधगत्या जीवन प्रवासावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट सर्व महाराष्ट्र मध्ये प्रदर्शित होत असल्याने युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांच्या संकल्पनेतून मुळशी मधील नागरिकांसाठी मोफत विशेष शो चे आयोजन पिरंगुट येथील फॅन स्वेअर सिनेमा गृहात करण्यात आले.
आनंद दिघे यांनी शिवसेनेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. रस्त्यावर उतरून संघर्ष करून सर्वसामान्य माणसात मिसळून त्यांनी उत्तम संघटन केलं त्यांच्या जीवनशैलीचा परिचय व्हावा आणि शिवसेना कार्यकर्ता म्हणून पक्ष विस्तारासाठी कार्यकर्ता घडविण्याचे दिघे साहेबांनी आयुष्यभर केलेलं काम शिवसैनिक – युवासैनिक यांना समजावे आणि सर्वांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी या हेतूने या विशेष मोफत शो चे आयोजन करण्यात आले असल्याचे युवासेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांनी सांगितले आहे.
यावेळी शिवसेनेचे जेष्ठ आबासाहेब शेळके, नामदेव आप्पा टेमघरे, शिव सहकार सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,तालुका समन्वयक हनुमंत सुर्वे, उपतालुकाप्रमुख शिवाजी वीर, लहू लायगुडे, उपतालुका समन्वयक संजय साठे, युवासेना भोर शहर अधिकारी सुशील तारू, विभागप्रमुख शिवाजी बलकवडे, प्रदीप बोंन्द्रे, महादेव वीर, उपविभागप्रमुख दिलीप मारणे, रुपेश जाधव, संजय साठे, विभाग संघटक रमेश टेमघरे, शैलेश मालपुटे, दत्ता कालेकर, दिपक ववले,महादेव जोरी, धर्मा फाले, अनिल दुर्गे, अक्षय भरम, युवासेना प्रसिद्धीप्रमुख अक्षय शिंदे, ऋषिकेश सोनवणे, निखिल रुकर, विजय पिंगळे, शिवाजी वाघवले, अमर बलकवडे, यश पिंगळे, मयूर रानवडे,आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.