बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती एमआयडीसीमध्ये आयएसएमटी कंपनीत लोखंडी पाईप तयार करणाऱ्या कंपनीत आज सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या अपघातात डोक्यावर लोखंडी रॉड पडल्याने एक कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला.
संतोष देवकाते असे या कामगाराचे नाव आहे. अपघात झाल्यानंतर या कामगारास दवाखान्यात नेण्यात आले होते. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.