माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
नसरापूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आज शनिवारी सर्वसामान्य रुग्णांची सोय व्हावी यासाठी मोफत डायलेसिस व अल्प दरात सिटीस्कॅन उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाचे उद्घाटन छत्रपती घराण्यातील १३ व्या वंशज सातारा गादी श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती सिद्धिविनायक फाऊंडेशनचे डॉक्टर राजेंद्र डिंबळे यांनी दिली.
सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर व सिद्धिविनायक डायग्नोस्टिक सेंटर बिग्ज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १४ मे रोजी सायं ४ वाजता सिध्दिविनायक हॉस्पिटल नसरापूर येथे या उपक्रमाचे शुभारंभ होणार असून नागरिकांनी व रुग्णांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सिद्धिविनायक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले असून यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हा परिषदेचे शिवजयंती महोत्सव समितीचे अमित गायकवाड, अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे.
सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सुविधा..
२४ तास अत्यावश्यक सेवा, अत्याधुनिक सुसज्ज अतिदक्षता विभाग, तीन सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, ट्रॉमा केअर युनिट, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हार्निया, गॉल ब्लडर, शासनमान्य गर्भपात केंद्र, त्वचारोग व हेअर ट्रान्सप्लांट सेंटर, प्लॅस्टिक व कॉस्मेटिक सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, मेडिक्लेक कॅशलेश सुविधा उपलब्ध, मुत्ररोग, दुर्बिणीतून मुतखडा फोडण्याची सोय, प्रोस्टेट तसेच सी.टी. स्कॅन, डिजिटल एक्स-रे, ई.सी.जी, सोनाग्राफी, स्ट्रेस टेस्ट, डी-इको व कलर डॉप्लर, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, मेडिकल स्टोअर, २४ तास कार्डियाक सोय उपलब्ध आहे.