मुंबई : महान्यूज लाईव्ह
राजकारणाच्या खेळात कुठला मुद्दा केव्हा उचलायचा याला फार महत्व असते. अस्सल राजकारणीच असा खेळ खेळू शकतात. पण नियती नावाची एक शक्ती आहे, ती जेव्हा अशा खेळात आपले पत्ते टाकते त्यावेळी सारा पटच बदलून जातो.
राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा आता अशाच नियतीच्या खेळीचा शिकार बनत चालला आहे. या दौऱ्याला आतापर्यंत भाजपाचा उत्तर प्रदेशमधील एक खासदार विरोध करत होता. त्यावेळी हा विरोध बृजभूषण शरद सिंग यांचा व्यक्तिगत आहे, असे वाटत होते. आता त्यांना पाठिंबा वाढू लागला आहे. महाराष्ट्र भाजपा आजपर्यंत राज ठाकरे यांना अनुकूल भुमिका घेण्याच्या मुडमध्ये होती. पण आता मुंबई भाजपामधूनही विरोधाचे सूर उमटत आहे.
मुंबई भाजपाचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी राज ठाकरेची फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर यांची माफी मागावी अशी उघड मागणी केली आहे.
या सगळ्या खेळामागे अयोध्देच्या रामाबद्दलचे प्रेम आहे असे क्वचितच कुणाला वाटेल. हा सगळा राजकारणाचा खेळ आहे, आणि आता हा खेळ रंगण्याचे कारण मुंबईची महापालिका निवडणूक आहे. या निवडणूकीत आपल्याला भाजपाचा साथीदार म्हणून जागा मिळावी आणि त्यांच्या सोबतीने आपले किमान मुंबई महानगरपालिकेतील अस्तित्व टिकवून ठेवावे यासाठी ही राज ठाकरेंची सगळी धडपड आहे.
बृजभूषण शरण सिंग यांना राज ठाकरेंच्या विरोधात आपला राजकीय फायदा दिसला. राज ठाकरेंनी परप्रांतियांना विरोधाच्या नावाखाली दोन तीन वर्षापूर्वी केलेल्या मारहाणीचा मुद्दा बनवून आता ते आपले राजकीय वजन वाढवू पहात आहे. सुरुवातीला महाराष्ट्र भाजपा या विषयावर शांत होती, नंतर त्यांनी थोडी राज ठाकरेंना अनुकुल भुमिका घ्यायला सुरुवात केली होती. पण आता मुंबई भाजपानेही थेट विरोधाची भुमिका घेतली आहे.
मुंबई भाजपाची ही भुमिकाही राजकारणासाठीच आहे. त्यांचे लक्षा उत्तर भारतीय मतदारांवर आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत उत्तर भारतीयांची मते सर्वसाधारणपणे भाजपाच्याच बाजूने जातात. पण याच उत्तर भारतीय मतदारांच्या मनात राज ठाकरेंबद्दल जबरदस्त नाराजी आहे. जर राज ठाकरेंना जास्त जवळ केले तर ही उत्तर भारतीय मते गमावण्याचा मोठा धोका आहे. राज ठाकरेंमुळे काही प्रमाणात मराठी मतांची बेगमी भाजपासाठी होऊ शकते, पण या राजकारणाच्या गणितात भाजपाला नुकसानच उठवावे लागू शकते याचीही जाणीव भाजपाला झाली आहे.
त्यामुळे आता राज ठाकरेंच्या या अयोद्धेच्या दौऱ्याला विरोध वाढतच जाईल अशी शक्यता आहे. आता राज ठाकरेंसमोर मोठा राजकीय पेच आहे. त्यांनी मुद्दा अगदी योग्य उचलला होता. भोंग्यावरून वातावरण तापवून आपला भगवा रंग पक्का असल्याचीही खात्री करून देण्याचा प्रयत्न केला होता. पण नियतीनेही आपला खेळ खेळला आहे, ज्याची जाणीव राज ठाकरेंना बहूधा नव्हती. आता यापुढचा गेम इंटरस्टेस्टींग होत जाणार आहे.
बघुया.
हाच खरा चेहरा आहे का भाजप चा ??? हिंदुत्ववादी म्हणे , एक हिंदूला हिंदू मंदिरात जाण्यासाठी अडवणूक करणारा , मराठी माणसांनी तुम्हा उत्तर भारतीयांना सांभाळून घेतलं आहे त्याचा गैरफायदा उचलू नका नाहीतर हिंदुत्व राहील बाजूला मराठी मुद्द्यावर मनसे उभा राहील तर खूप जड जाईल