पर्यावरण

मांजर समजून पाळला चक्क बिबट्याचा बछडा ! दिड वर्षाच्या बाळालाही लागला होता लळा !

नाशिक : महान्यूज लाईव्ह

महाराष्ट्रात आता सगळीकडेच बिबटे आढळू लागले आहेत. ऊसाच्या शेतात बिबट्याचे बछडे सापडण्याचे प्रमाणही खुप आहे. पण नाशिक जिल्ह्यातील मालेगावजवळच्या मोरदर शिवारात जे घडले ते मात्र अजबच होते.

रावसाहेब ठाकरे यांचे मोरदर शिवारातच घर आहे. या घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांना एक मांजर सापडली आणि सगळेजण तिच्याशी खेळू लागले. ती मांजरीचीही त्यांच्याशी चांगलीच गट्टी जमली.

पण ज्यावेळी घरातील मोठ्या माणसांनी ही मांजर निरखून पाहिली त्यावेळी त्यांना धक्काच बसला. ती मांजर नसून चक्क बिबट्याचा छोटा बछडा होता.

त्यानंतर ते कुटुंब सावध झाले आणि बछड्याच्या आई त्याला न्यायला येते का याची वाट पाहू लागले. परंतू आठ दिवस उलटले तरी त्याची आई काही आली नाही.

या आठ दिवसात या ठाकरे कुटुंबानेच या बछड्याचा सांभाळ केला. त्याला दररोज दीड लिटर दुध लागायचे. ठाकरे यांच्या दीड वर्षाच्या नातीलाही या बछड्याचा चांगलाच लळा लागला होता. पण आठवड्यानंतर मात्र या बछड्याला वन विभागाच्या सुपूर्त करण्यात आले.

tdadmin

Recent Posts

जागा उपलब्ध करा; दौंडला विद्या प्रतिष्ठान सारखी चांगली शिक्षण संस्था उभी करतो! माजी कृषिमंत्री शरद पवार यांचे दौंडकरांना आश्वासन!

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह दौंडमध्ये चांगल्या दर्जाची शिक्षण संस्था नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना तालुक्याबाहेर शिक्षणासाठी जावे…

1 day ago