मुंबई : महान्यूज लाईव्ह
हिंदी गाण्यांवर तुफान डान्स करणारे आफ्रिकन भाऊबहिण तुम्हाला सोशल मिडियाच्या माध्यमातून नक्कीच पहायला मिळाले असतील. याच टांझानियाच्या सोशल मिडिया स्टार किली पॉलवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. स्वत: किलीने याची माहिती त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.
माझ्यावर ५ अज्ञात लोकांनी हल्ला केला. माझ्या उजव्या हाताच्या बोटाला जखम झाली आहे. माझ्या हाताला ५ टाके पडलेत. याशिवाय मला लाठ्या काठ्यांनेही मारहाण करण्यात आली.पण मी देवाचे आभार मानतो. हल्ला होऊनही मी थोडक्यात बचावलो आहे. माझ्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा, असे किलीने २९ एप्रिलच्या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर म्हणले आहे.
हिंदी गाण्यावर रिल्स बनविणाऱ्या किली पॉल आणि त्याची बहिण नीमा पॉल यांचा भारतात लाखो चाहते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मन की बात कार्यक्रमात या जोडीचे कौतुक केले होते.