लोणार : महान्यूज लाईव्ह
लोणार तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार संदीप मापारी पाटील व प्रवक्ता राहुल सरदार दैनिक सम्राट तसेच कोषाध्यक्ष श्याम सोनोने दैनिक सकाळ यांनी मागील दोन वर्षांमध्ये कोरोना काळात जिवाची पर्वा न करता प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य केले व सकारात्मक पत्रकारिता केली. प्रशासनाची अचूक माहिती जनतेपर्यंत पोचवली. प्रशासन व जनतेमधील सुसंवाद घडवून दोघांमधील दुवा बनून काम केले.
या कार्याची दखल घेत मेहकर उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी त्यांना सन्मानित केले. १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोणार तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सैपन नदाफ यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. बळीराम मापारी, न.प. उपाध्यक्ष बादशाह खान पठाण, ज्येष्ठ काँग्रेस नेते साहेबराव पाटोळे, नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष मारोतराव धांडे, सदस्य वाठोरे हे उपस्थित होते