शिरूर : महान्यूज लाईव्ह
पुणे ग्रामीण पोलिस दलातील तीन पोलिस अधिकारी व आठ अंमलदारांना पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात उत्तम कामगिरी तसेच उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवा करणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांचा पोलिस महसंचालक पदक देऊन गौरव करण्यात येतो.यावर्षी महाराष्ट्र पोलिस दलातील ८०० पोलिस अधिकारी व अंमलदार यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल हे पदक जाहीर करण्यात आले होते. या मध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलात काम करणाऱ्या तीन अधिकारी व आठ अंमलदार यांचा समावेश होता.
महाराष्ट्र दिनी पुणे ग्रामीण पोलिस मुख्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात पुणे ग्रामीण चे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याहस्ते खेड चे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे,सहायक फौजदार संदेश ओमसे,स्थानिक गुन्हे शाखेचे चंद्रकांत जाधव,वाचक शाखेचे मिर्झा बेग,पोलिस नाईक एम. ए.मोमीन,स्थानिक गुन्हे शाखेचे विजय कांचन,हवेली पोलिस स्टेशन चे रामदास बाबर,रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन चे रघुनाथ हळनोर,शंकर नवले यांचा सन्मान करण्यात आला.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे,राजू मोमीन,गुरू जाधव,विजय कांचन,सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे ( सध्या नेमणूक अमरावती ग्रामीण ) यांनी कामगिरीचा आलेख सातत्याने उचांवत ठेवला होता. अनेक महत्वाच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील धडाकेबाज कामगिरीमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलाची प्रतिमा अधिक उंचावली आहे.या अधिकारी व अंमलदारांना पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आल्याने सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार राजू मोमीन यांनी १५ वर्ष उत्कृष्ट सेवा केली असून २५० हून अधिक बक्षिसे प्राप्त केली आहेत तर सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांची २३ वर्ष उत्कृष्ट सेवा झाली असून ४५० हून अधिक बक्षिसे प्राप्त केली आहेत.