शिरूर : महान्यूज लाईव्ह
मांडवगण फराटा सारख्या छोट्या गावात ग्रामीण भागात ही दर्जेदार शिक्षण मिळत आहे हे अत्यंत समाधानाचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी व्यक्त केले.
मांडवगण फराटा ( ता.शिरूर ) येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला येथे उद्योगपती प्रकाश धारिवाल यांनी भेट दिली, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्रकाश धारिवाल म्हणाले की, शिरूर तालुक्यातील पूर्व भागात मांडवगण फराटा हे छोटेसे गाव. गावात शिक्षणाच्या फारशा सोयी नसायच्या. त्यावेळी श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशाला सुरू करण्यात आली. आज या शाळेत परिसरातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थी परदेशात आहेत तर काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असे ते म्हणाले. संस्थेच्या कामकाजाची माहिती घेऊन यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे चिटणीस प्रा.नंदकुमार निकम यांनी वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर आमदार अशोक पवार यांनी संस्थेच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
दरम्यान प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या देणगीतून साकारलेल्या जैन स्थानकाचे लोकार्पण प्रकाश धरिवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार,संस्थेचे अध्यक्ष अनील बोरा, जाकिरभाई पठाण, चंदूलाल चोरडिया, शिरिष बरमेचा, धरमचंद फुलफगर, राजेंद्र भटेवरा, प्रवीण चोरडिया, सरपंच शिवाजी कदम, उपसरपंच सुभाष पाटील फराटे,दादा पाटील फराटे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे, बाबासाहेब फराटे, दत्तात्रय फराटे, लक्ष्मण फराटे, धनंजय फराटे,संभाजी फराटे प्राचार्य एस. टि.गद्रे,उप प्राचार्य सुनील थोरात,पर्यवेक्षक प्रमोद बाऊस्कर,यांसह सर्व शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
जैन स्थानक लोकार्पण सोहळयाला संतोष भंडारी,प्रवीण चोरडिया,विकास ताटीया,सचिन धोका,नरेंद्र लुंकड, पंकज देसर्डा,दिलीप धोका,भरत देसर्डा,रवींद्र संचेती यांसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.