दौंड : महान्युज लाईव्ह
दौंड पोलीस स्टेशनमध्ये ठाणे अमंलदार कक्षात सासु- सुनेची भांडण चालू होते. हे भांडण सोडवण्यासाठी व समजून सांगण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचारी यांनाच या महिलेने धक्का बुक्की करून अंगावर धावून आल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की. दौंड पोलीस ठाण्यात बुधवारी ( दि २७) ठाणे अंमलदार यांच्या कक्षात नयन गिरीश तायडे ( वय २८ रा.सय्यदनगर, हडपसर.ता.हवेली ) आणि तिची सासू सुरेखा बळीराम तायडे ( वय ४३ रा.बंगलासाईट ,दौंड ता.दौंड ) या दोघांमध्ये शाब्दीक वाद चालु होता. या सासु सुना यांच्यात शाब्दिक वाद वाढल्याने पोलीस हवालदार राऊत यांनी या महिलांची भांडणे सोडवण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी उषा अनारसे यांना सांगितले. त्या या महिलांची भांडणे सोडवत व त्यांना समजावून सांगत असताना सुरेखा तायडे हिने महिला पोलीस कर्मचारी उषा अनारसे यांच्या अंगावर धावून जावुन तिलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. तोंडात चापट्या मारल्या आणि धक्काबुक्की केली. इतर कर्मचाऱ्यांनी मध्ये पडून तिला सोडवले.
याबाबत वाहतूक महिला पोलीस कर्मचारी उषा अनारसे यांनी याबाबत दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने सुरेखा तायडे या महिलेवर धक्का बुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.