दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरात प्रवेश चोरट्यांनी घरातील मौल्यवान सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण पाच लाख ७० हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
बुधवारी ( दि.२७ ) पहाटे चार वाजण्याच्या आसपास ही घटना घडली. देऊळगाव गाडा येथील शेतकरी कुंडलिक भुजंग शितोळे तसेच सुखदेव बारवकर यांच्या घरात ही चोरी झाली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुंडलिक शितोळे हे रात्री काम करुन आल्यावर घरातील घर उघडे ठेवून झोपले होते. तसेच घरातील लोखंडी कपाट आणि लोकरची चावी हे कपाटालाच लावलेली होती. रात्री दिड ते पहाटे चार वाजण्याच्या आसपास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील लोखंडी कपाटाला चावलेली चावी काढून कपाटातील चार लाख किमतीचे सोन्याचे दागिन्यांची चोरी केली. तसेच सुखदेव बारावकर यांच्या ही घरातील कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम वीस हजार असे एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या दोन्ही घरातील एकुण पाच लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून पोबारा केला.याबाबत कुंडलिक शितोळे यांनी पाटस पोलीस चौकीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाटस पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार संदीप कदम, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली.