संदीप मापारी पाटील
लोणार : महान्यूज लाईव्ह
लोणार येथील गणेश विविध कार्यकारी भाग एकच्या सोसायटीची निवडणूक दिनांक २६ एप्रिलला पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदा साठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला होता. या मध्ये अध्यक्ष म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी तर उपाध्यक्षपदी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप मापारी यांची अविरोध निवड करण्यात आली. नेहमीच राजकारणा पेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे व गोरगरीब शेतकरी शेतमजूर बांधवांच्या न्याय हक्काच्यासाठी लढणारे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी यांची या सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष संदीप मापारी यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून वंचितांना न्याय देण्याचे काम केले. त्यांच्या या कामाची पावती म्हणून त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली
यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी, राष्ट्रवादीचे जिल्हासउपाध्यक्ष किशोर मापारीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी, नगरपरिषद गटनेते भूषण मापारी, कृषिउत्पन बाजार समितीचे माजी सभापती शिवापाटील तेजनकर, माजी सभापती संतोष मापारी, नगरसेवक डॉ अनिल मापारी, गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी, उद्धवराव मापारी, भाजपा नेते विजय मापारी, शहर अध्यक्ष गजानन अंकुशराव मापारी, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष गजानन मापारी, इम्रान खान पठाण, खलील कुरेशी, दिनकर घायाळ, अशोक वारे, राहुल मापारी, ऋषीकेश मापारी, सुनील मापारी, राहुल सुभाषराव मापारी उपस्थित होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर टी खराटे, एस एस राठोड व सोसायटी सचिव विजय चनखोरे यांनी काम पाहिले.