मुंबई : महान्यूज लाईव्ह
रंग माझा वेगळामध्ये दिपाचे वाईट दिवस आज संपतील, उद्या संपतील असे म्हणज प्रेक्षक अजुनही मालिका पाहण्याचे सोडत नाहीत. काळासावळ्या दिपावर प्रेक्षकांचे, विशेषत: महिलाांचे प्रचंड प्रेम जडले आहे. पण खऱ्या आयु्ष्यातील दिपाचे म्हणजेच रेश्मा शिंदेचेही मन कुठेतरी जडले असल्याच्या बातम्यांनी सध्या जोर पकडला आहे.
ज्याच्यावर लोकांना संशय आहे तोदेखील एका मालिकेचा हिरो आहे. स्वाभीमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील शंतनूची भुमिका साकारणारा अक्षर कोठारे रेश्माचा पुर्वीपासूनच चांगला मित्र आहे. चाहूल नावाच्या चित्रपटात त्यांनी एकत्र कामही केले आहे. त्यांची चांगली मैत्रीही आहे.
पण या मैत्रीच्याही पुढे काही आहे का , या प्रश्नावर दोघेही थेट उत्तर देण्याचे टाळताना दिसत आहेत. यामुळेच या शंकेने जोर पकडला आहे. इंस्टाग्रामवर अक्षर कोठारीने चाहत्यांसोबत संवाद साधला असताना एका चाहत्याने त्याला तो आणि रेश्मा रिलेशनशीपमध्ये आहेत का ? असे विचारले होते. त्यावर अक्षरने रेश्माला टॅग करत ‘ कोई कहे, कहता रहे, कितना भी हमको दिवाना ‘ हे गाणे अॅड केले होते.
त्यावर रेश्मानेही थेट काही न बोलता स्माईजी इमोजी टाकला होता. यावरून हे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले. अर्थात चर्चेत राहण्यासाठी अनेकदा असे फंडे अजमावले जातात. हा प्रकार त्यापैकीच आहे, की खरोखरच दोघेही या नात्याबाबत गंभीर आहे, हे आज ना उद्या सगळ्यांच्या नजरेसमोर येणारच आहे.