माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
ईदच्या व आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजगड पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली २६ एप्रिल रोजी रूट मार्च काढून सर्व घटकातील नागरिकांनी कायद्याचे पालन करावे असे आवाहन करत अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी रूट मार्चद्वारे केले.
संवेदनशील व अतिसंवेदनशील भागात आगामी सण-उत्सवांच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी दंगा काबू योजना घेण्यात येते. त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक निखिल मगदूम, ठाण्याचे सर्व अंमलदारसह पोलीस कर्मचाऱ्यांनी नसरापूर ( ता. भोर ) येथील बाजारपेठे ते चेलाडीपर्यंत पथसंचलन केले. यावेळी शासन परिपत्रकानुसार योग्य त्या सूचना देण्यात