माणिक पवार
भोर : महान्यूज लाईव्ह
धूम स्टाईलने भरधाव मोटारसायकलवरून यायचे, महिलांच्या अंगाखांद्यावरील सोने जबरदस्तीने काढून घ्यायचे आणि वाऱ्याच्या वेगाने पसार व्हायचे हा त्याचा उद्योग. सासवड, लोणीकाळभोर, देहुरोड, भोसरी, शिक्रापूर, लोणीकंद येथे अशाप्रकारे दागिने लुटलेल्या या चोराला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.
मंगल बजरंग नानावत हा वरील गु्न्हे करणारा आरोपी रांजणगाव येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलिस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांना मिळाली होती. त्या माहितीनूसार रांजणगाव येथे सापळा रचून या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सध्या त्याला सासवड पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरु आहे.