व्हिडिओ पहा.. नवनीत राणा म्हणाल्या, पाणीसुद्धा दिलं नाही! पोलीस आयुक्तांनी चहा पितानाचा व्हिडिओ केला शेअर!

मुंबई : महान्यूज लाईव्ह

खासदार नवनीत राणा या किती खोटं बोलतात याचा नमुना थेट पोलीस आयुक्तांनीच सोशल मीडियावर शेअर केला आहे. कालच नवनीत राणा यांनी आपल्याला पाणी सुद्धा दिलं नाही अशी तक्रार केली होती. त्याची री खुद्द या राज्याचे माजी मुख्यमंत्री व गृह खात्याचे मंत्री झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी देखील ओढली होती. मात्र आज मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी थेट नवनीत राणा यांचा चहा पितानाचा; तेही सन्मानाने चहा पितानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता

हा व्हिडिओ शेअर केल्यामुळे नवनीत राणा यांच्या खोटारडेपणाचा भांडाफोड झाला असून नवनीत राणा यांनी कोठडीत असताना पोलिसांनी पाणीसुद्धा दिले नाही असा आरोप करून लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहिले होते. मात्र नवनीत राणा आणि रवी राणा यांना खुर्चीत सन्मानाने बसून चहा दिल्यानंतरचा व्हिडिओ खुद्द पोलीस आयुक्तांनीच ट्विटरवर शेअर केल्याने आता नवनीत राणा चांगल्याच तोंडावर आपटल्या आहेत.

गेल्या तीन चार दिवसापासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दोघे जण माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. आज पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी या दोघांना चहा देतानाचा व्हिडिओ शेअर करून आम्ही अधिक काही बोलायची गरज आहे का? असा प्रश्न केला आहे. आपण अनुसूचित जातीचे असल्यामुळे पाणी पिण्याचा मूलभूत हक्क आपल्याला नाकारला असा आरोप नवनीत राणा यांनी काल केला होता. त्यावरून बरीच घमासान चर्चा माध्यमावरही रंगली होती.

Maha News Live

Recent Posts

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह वाई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या…

14 hours ago