महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
देशभरात सुरू असलेल्या प्रार्थना स्थळावरील भुंग्यांच्या विषयासंदर्भात उत्तर प्रदेशात योगी सरकारने कठोर भूमिका बजावली आहे त्याचा परिणाम म्हणून सर्वच धर्मियांच्या प्रार्थना स्थळावरील भोंग्याचा आवाज आता कमी झाला आहे.
उत्तर प्रदेशातील प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यस्था विभागाच्या अतिरिक्त महानिरीक्षक प्रशांत कुमार यांच्या माहितीनुसार 17000 ठिकाणी आपणहून लोकांनी मशिद अथवा इतर धर्मीय प्रार्थना स्थळावरील भोंग्यांंचा आवाज कमी केला आहे.
याकरता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील 37 हजार धर्मगुरूंशी चर्चा केली आहे. राज्यातील जातीय सलोख्याचे उदाहरण दाखवताना मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभुमीवरील ध्वनिक्षेपक हटवण्यात आले असून दररोज होणारे विष्णुसहस्त्रनाम वादन सध्या थांबवण्यात आले आहे.
दुसरीकडे गोरखनाथ मंदिर परिसरातही भोंग्यांचा आवाज कमी करण्यात आला असून प्रशासनाच्या परवानगीखेरीज कोणतेही धार्मिक कार्यक्रमात धार्मिक मिरवणुका काढण्यावर कठोर निर्देश घालून दिले आहेत.