संदीप मापारी पाटील
लोणार : महान्यूज लाईव्ह
औरंगाबाद येथील वॉचमन म्हणून काम करणारे मनोज आव्हाड या मातंग युवकाला चोरीच्या संशयावरून मारहाण करून त्याची अमानुषपणे निर्घृण हत्या करण्यात आली. त्याची हत्या करणाऱ्या कायद्याची भीती नसलेल्या गावागुंडांना फाशीची शिक्षा करण्यात यावी, तसेच राज्यात विविध ठिकाणी मातंग समाजावर सतत अन्याय होत आहेत, याचा सुद्धा गांभीर्याने विचार व्हावा, आणि मनोज आव्हाड यांच्या परिवाराला न्याय मिळावा अशी शिफारस मनिष साहेबराव पाटोळे ( युवा जिल्हाध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम) तसेच यांचे सहकारी महेश घाटोळे, सचिन साठे, विलास रनसिंगे, केतन बाजड, ओम पाटोळे, कैलास खरात, सुनील साठे, अमोल घाटोळे, रोहित अंभोरे व इतर कार्यकर्ते यांनी लोणारच्या तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्रीना केली आहे.
मनिष पाटोळ, विजू भाऊ अंभोरे ( उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम संस्थापक ) व साहेबरावजी पाटोळे ( महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ) तसेच इतर पदाधिकारी यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले