संदीप मापारी पाटील
बुलढाणा : महान्यूज लाईव्ह
बुलढाणा येथे बिरसा क्रांती दल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक नुकतीस पार पडली. बिरसा क्रांती दलाचे संस्थापक दशरथ मडावी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डी. बी.अंबुरे ( उपाध्यक्ष ) हे होते. तसेच बीरसा क्रांती दल बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भगवानराव कोकाटे , अकोला जिल्हाध्यक्ष संतोष ठाकरे , महाराष्ट्र राज्य सचिव संभाजी लक्ष्मण खुळे,कार्यकारी अभियंता बुलढाणा मनोज पंधरे इत्यादी होते.
भगवानराव कोकाटे यांनी आपल्या भाषणामध्ये बिरसा मुंडा यांचे विचार व कार्य तळागाळातील लोकापर्यंत पोहचले पाहिजे यासाठी संघटनेचा कार्य चालू असल्याचे सांगितले. भाषणाच्या सरते शेवटी बिरसा मुंडा यांच्या स्मुर्ती दिन साजरा करण्यासाठी यवतमाळ येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे यासाठी त्यांनी पाच हजार रु.पावती फाडली. सर्व बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तसेच आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमाला आर्थिक मदत करावी व आदिवासीच्या सन्मानासाठी एकत्रित यावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांनी आदिवासीवर होत असलेला अन्याय व आदिवासी विषयी राक्षस ,असुर, दास, दानव, रानटी, जंगली अशा शब्दात होणारा अपमान सहन करून घेणार नाही असे फटकून सांगितले.
शेवटी आदिवासी लोकांनी आदिवासीचा सन्मान उराशी बाळगून कार्य केले पाहिजे यासाठी सर्व आदिवासी बांधवांनी बिरसा मुंडा यांच्या १२२ व्या स्मृती दिनानिमित्त ९ जून २०२२ रोजी यवतमाळ येथे भव्य आदिवासी सन्मान परिषदेमध्ये आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला विष्णु कोवे , माजी बी. ओ. एस.आर.ठाकरे , उध्दव पारधी, करवते साहेब व बुलढाणा जिल्ह्यातील महिला व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन डुडुळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगेश यांनी केले.