मुंबई : महान्यूज लाईव्ह
मोदींवर टिका केली तर काय होते, याचा अनुभव सध्या गुजराथचे आमदार जिग्नेश मेवाणी घेत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते सध्या राणा दांम्पत्य लोकप्रतिनिधी असल्याचे वारंवार सांगत आहे. मात्र याच भाजपाने गुजराथचे आमदार जिग्नेश मेवाणी एकादिवशी अचानक गुजराथमध्ये अटक करून आसामला नेले. आसामच्या न्यायालयाने जामीन दिल्यावर पुन्हा त्यांना नव्या गु्न्ह्याखाली अटक केली. ऐवढे सगळे करण्यामागचे कारण काय तर जिग्नेश मेवाणींनी केलेले मोदींविरोधातील एक व्टिट. या व्टिटमुळेच भाजपा इतकी संतापली की मेवाणी गुजरातच्या लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, याचीही पर्वा त्यांनी केली नाही.
पहिल्यांदा गुरुवारी आमदार जिग्नेश मेवानी यांना गुजरातमधील पालनपुर येथून आसाम पोलिसांनी अटक केली. आसाममधील एका भाजपाच्या नेत्याने दाखल केलेल्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली होती. त्यांना अटक का करण्यात आली आहे, याची माहिती देण्यासही आसाम पोलीस तयार नव्हते. याबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी ‘ कोण जिग्नेश मेवाणी, मी ओळखत नाही. ‘ असे उत्तर दिले होते.
देशात ठिकठिकाणी सुरु असलेल्या हिंसाचाराला मोदी जबाबदार आहेत, अशा अर्थाचे व्टिट केल्याबद्दल आमदार मेवाणी यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे नंतर स्पष्ट झाले. काल त्यांच्या जामीनअर्जावरील निर्णय न्यायालयाने सुरक्षित ठेवला. आज ( सोमवारी ) न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला, लगेचच आसाम पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्याखाली त्यांना अटक केली.
मोदींच्या राज्यात विरोधाला स्थान नाही, कुठल्याही मार्गाने विरोधकांना संपवण्याचे मोदी सरकारचे धोरण राहिलेले आहे. आमदार जिग्नेश मेवाणी त्याचे आणखी एक उदाहरण आहे.
कॉंग्रेसनेही या घटनेचा निषेध करत गुजराथ विधानसभेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन ही कारवाई करण्यात आल्याचे म्हणले आहे.