बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या बाजारपेठेतील राजस्थान एस एस, जयहिंद जनरल स्टोअर्स व बी. एल. तिवाटणे या तीन दुकानात चोरट्यांनी हात साफ केला आहे. या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
चोरटे हे दुकानाच्या टेरेसवरून दुकानात शिरल्याचे स्पष्ट झाले आहे. यामधील एका दुकानात कापड, तर दोन दुकानातून रोकडसहीत काही मालाची चोरी झालेली आहे.
बारामती पोलिसांनी या दुकानांना भेट देऊन पाहणी केली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.