सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या बनलेल्या शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विचाराच्या स्वाभिमानी परिवर्तन पॅनेलने 21 विरुद्ध 0 असा मोठा विजय मिळवला असून हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराच्या सत्ताधारी पॅनलचा धक्कादायक पराभव झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची निवडणूक आज झाली. शिक्षक पतसंस्थेच्या प्रांगणात या निकालानंतर स्वाभिमानी परिवर्तन पॅनल च्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
ही निवडणूक गुरुजींची असली तरी तालुक्यात जवळपास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे विरुद्ध माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचारांच्या समर्थकांमध्येच ही लढत झाल्याचे दिसून येत होते. या निवडणुकीत इंदापूरच्या सर्वसाधारण मतदार संघातून शशिकांत किसन शेंडे, प्रशांत रामचंद्र घुले, दत्तात्रय अजिनाथ ठोंबरे हे विजयी झाले.
सणसर निमसाखर सर्वसाधारण मतदारसंघातून आदिनाथ विठ्ठल धायगुडे, संतोष दादाराम गदादे, सदाशिव सज्जन रणदिवे हे विजयी झाले. भिगवण लोणी देवकर सर्वसाधारण मतदारसंघातून अनिल उत्तम शिंदे, बालाजी श्रावण कलवले, सतीश विठ्ठल दराडे, भारत तात्याराम भांडे हे विजयी झाले.
निमगाव केतकी लासुर्णे मतदारसंघातून संजय सोपान म्हस्के, सतीश सावळाराम गावडे व भाऊसाहेब जगन्नाथ वणवे यांनी विजय मिळवला. बावडा – रेडणी मतदारसंघातून संतोष तानाजीराव तरंगे, रामचंद्र बलभीम शिंदे व दत्तात्रय सदाशिव चव्हाण हे विजयी झाले.
महिला राखीव प्रवर्गातून संगीता सुरेश पांढरे व संजीवनी उद्धव गरगडे हे विजयी झाले तर अनुसूचित जाती जमाती राखीव प्रवर्गातून सुहास नामदेव मोरे, भटक्या विमुक्त जाती जमाती राखीव प्रवर्गातून सचिन भानुदास देवडे तर इतर मागासवर्गीय राखीव प्रवर्गातून किशोर राजाराम वाघ यांनी विजय मिळवला.
या निवडणुकीत माजी सभापती दत्तात्रय तोरसकर यांनी मोठी भूमिका बजावली. यामध्ये स्वाभिमानी शिक्षक परिवर्तन पॅनेलने सत्ताधारी विकास पॅनलचा 21 विरुद्ध शून्य असा पराभव केला.